छत्रपती संभाजीनगरात अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणेचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट या अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणेचे लोकार्पण मनपा मुख्यालयात उत्साहात पार पडले. उंच इमारतींमध्ये लागणा
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट या अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणेचे लोकार्पण मनपा मुख्यालयात उत्साहात पार पडले.

उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीवर वेगाने आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ही आधुनिक यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे शहरातील अग्निशमन विभागाची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक बळकट होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, उपसभापती आणि नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “सुरक्षित छत्रपती संभाजीनगर — हेच आमचे ध्येय,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande