बीडमध्ये ३३९ पोलीस पाटलांची भरती अंतिम टप्प्यात; १ मे रोजी नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।बीड उपविभागातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ४१४ रिक्त पदांसाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेत ३३९ उमेदवारांच्या मुलाखतींच
बीडमध्ये ३३९ पोलीस पाटलांची भरती अंतिम टप्प्यात; १ मे रोजी नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता


बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।बीड उपविभागातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ४१४ रिक्त पदांसाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेत ३३९ उमेदवारांच्या मुलाखतींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. सध्या निवड झालेल्या पात्र उमेदवारांची चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून युद्धपातळीवर केली जात आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी या नवनियुक्त पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रे दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या नियुक्त्यांमुळे गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि शासकीय योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande