अंजनगाव सुर्जी खत विक्री केंद्रातून ११.९६ लाखांचा अपहार; गोडाऊन किपरवर गुन्हा दाखल
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : येथील आठवडी बाजार परिसरातील शिवकृपा ऍग्रो एजन्सी या खत व कीटकनाशक विक्री केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 661 पोती खत परस्पर विकून 11 लाख 96 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोडाऊन किपर अंकुश
अंजनगाव सुर्जीतील कृषी सेवा केंद्रात ११.९६ लाखांच्या खताची परस्पर विक्री गोडाऊन किपरविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : येथील आठवडी बाजार परिसरातील शिवकृपा ऍग्रो एजन्सी या खत व कीटकनाशक विक्री केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 661 पोती खत परस्पर विकून 11 लाख 96 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोडाऊन किपर अंकुश धुळे याच्याविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, वसंत मोतीराम भगत (वय 54) हे शिवकृपा अॅग्रो एजन्सीचे संचालक असून आरोपी अंकुश धनंजय धुळे (वय 30, रा. द्वारका चौक, सुर्जी) हा गेल्या दोन वर्षांपासून गोडाऊन किपर म्हणून कार्यरत होता. आरोपीने मालकाला कोणतीही कल्पना न देता गोडाऊनमधील डीएपी, पोटॅशसह विविध कंपन्यांची 661 पोती खते परस्पर विकली. या खतांची अंदाजे बाजार किंमत 11.96 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

साठा तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वसंत भगत यांनी 16 एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316 (4), 318 (4), 408 व 420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हा अपहार 30 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीने खत कोणाला विकले आणि अपहाराची रक्कम कुठे वापरली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande