लातूर - नवीन जिल्हा रुग्णालयाला स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्याची मागणी
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)। शहरात प्रस्तावित नवीन जिल्हा रुग्णालयाच्या नामकरणाबाबत महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. या रुग्णालयास ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे क
जिल्हा रुग्णालय


लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)। शहरात प्रस्तावित नवीन जिल्हा रुग्णालयाच्या नामकरणाबाबत महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. या रुग्णालयास ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.

लातूरकरांना अनेक वर्षांपासून नवीन जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा होती. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच पत्रकारांच्या माध्यमातून सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात आला. महायुती शासनाने या रुग्णालयासाठी निधी मंजूर करून प्रकल्पाला गती दिली असून, येत्या १८ एप्रिल रोजी भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर, महाराष्ट्र तसेच देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने त्यांच्या स्मरणार्थ रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, १० मार्च रोजी झालेल्या मनपा सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा होऊन शासनाकडे शिफारस करण्याबाबत सूचना मांडण्यात आल्याचे समजते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande