
कोल्हापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar