सोलापूर: आरटीओत आकर्षक वाहन क्रमांकांसाठी 20 एप्रिलला अर्ज प्रक्रिया
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे वाहनांच्या नवीन मालिकेच्या प्रारंभाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर ताण येतो आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया
सोलापूर: आरटीओत आकर्षक वाहन क्रमांकांसाठी 20 एप्रिलला अर्ज प्रक्रिया


सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे वाहनांच्या नवीन मालिकेच्या प्रारंभाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर ताण येतो आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या दुचाकी वाहन मालकांना पसंतीचे क्रमांक हवे असतील त्यांनी 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज, डीडी (केवळ क्र. 16 अन्वये जारी), पत्त्याचा पुरावा, आधार लिंक मोबाईल नंबर, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन नोंदणी विभागात स्वतः जमा करावेत. डीडी “Dy R.T.O. Solapur” यांच्या नावे राष्ट्रीयकृत अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक असून इतर नावाचे डीडी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्जासोबत केंद्र व राज्य मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे. एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.

लिलाव प्रक्रियेसाठी इच्छुक अर्जदारांनी अधिक रकमेचा डीडी 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात जमा करावा. लिलावासाठी सादर होणारा डीडी किमान 300 रुपयांपेक्षा कमी नसावा आणि तो किमान एक महिन्याच्या वैधतेचा असणे आवश्यक आहे.

आगामी 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडण्यात येतील आणि सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित पसंतीचा क्रमांक प्रदान केला जाईल.

एकदा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. तसेच तो 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी वापरणे बंधनकारक असून तसे न केल्यास तो क्रमांक रद्द होईल व शुल्क शासनाकडे जमा होईल. ही फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही किंवा समायोजित केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande