सोलापूर शहर हद्दीत डॉल्बी वापरास बंदी
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.) :- सोलापूर शहर हद्दीत 14 ते 21 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री. महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्य
सोलापूर शहर हद्दीत डॉल्बी वापरास बंदी


सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)

:- सोलापूर शहर हद्दीत 14 ते 21 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री. महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163(1) अन्वये डॉल्बी वापरास प्रतिबंध घालण्यात येत आहे. असे पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राज कुमार यांनी कळविले आहे.

जयंती उत्सव काळातील मिरवणूकी पाहण्याकरीता आलेल्या नागरिकांपैकी काही नागरिकांनी डॉल्बी सिस्टीममुळे कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. याबाबत सोलापूर शहरातील जेष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीममुळे जिवितास धोका तसेच इतर शारीरिक दुष्परिणाम होत असल्याचे निवेदने या कार्यालयास सादर केले आहेत.

तसेच या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande