दिनदयाल कौशल्य केंद्राच्या कार्यशाळेत गाड्यांची सर्व्हिसिंग - 'ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन’ची स्थापना
छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) ’ऑटोमोबाईल'' या विषयात व्होकेशेनल शिक्षण घेणारे विद्यार्थी आता थेट ’ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन’ मधून दुचाकीं व चारचाकी गाड्यांची सर्व्हिसिंग व्यवसायिक पद्धतीने करणार आहेत. या महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुर
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) ’ऑटोमोबाईल' या विषयात व्होकेशेनल शिक्षण घेणारे विद्यार्थी आता थेट ’ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन’ मधून दुचाकीं व चारचाकी गाड्यांची सर्व्हिसिंग व्यवसायिक पद्धतीने करणार आहेत. या महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या १५ वर्षांपासून दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र कार्यरत आहे. या अंतर्गत बी.व्होक, एम.व्होक हे पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यामध्ये ’इंडस्ट्रील ऑटोमेशन’ व ’ऑटोमोबाईल’ या दोन शाखांचा समावेश आहे. या पदवीचे नामकरण बी.टेक करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. तसेच ’ऑटोमोबाईल' या शाखेतील विद्यर्थ्यांसाठी ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन अर्थात ’टू-व्हिलर, फोर व्हिलर गॅरेज’ सुरु करण्यासाठी २४ मार्चच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत मान्यता देण्यात आली. व्यावसायिक आस्थापनांप्रमाणे या ठिकाणी गाडयांची सर्व्हिसींग करण्यात येणार आहे. या यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विभागाच्या संचालक डॉ.भारत गवळी, अधिसभा सदस्य भास्कर साठे, युनिक संचालक डॉ. प्रवीण यन्नावर, कार्यकारी अभियंता रविंद्र काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विभागातील प्राध्यापक डॉक्टर कुणाल दत्ता, प्रा. विशाल उशीर, प्रा.अमोघ सांबरे, प्रा. गंगाधर बंडेवाड, प्रा.अस्मिता वाणी आदींची उपस्थिती होती.

या ठिकाणी गाड्यांची सर्व्हिसिंग, इंजिन ब्रेक व क्लच दुरुस्ती, वायरिंग, बॅटरी , लायटिंग आदी कामे करण्यात येणार आहेत. नवीन स्थापन करण्यात आलेले हे सर्व्हिस स्टेशन व्यावसायिक ऑटोमोबाईल सेवा पुरविण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. येथे दोनचाकी व चारचाकी वाहनांसाठी नियतकालिक देखभाल, इंजिन, ब्रेक व क्लच दुरुस्ती, इलेक्ट्रिकल डायग्नॉस्टिक्स तसेच बॅटरी व लाइटिंग सिस्टीम तपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

डीडीयू कौशल्य केंद्राच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले की, “हा उपक्रम विद्यापीठाच्या अनुभवाधारित शिक्षणाच्या धोरणाशी सुसंगत असून, विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देईल. यामुळे त्यांची तांत्रिक क्षमता आणि रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होईल.” डीडीयू कौशल्य केंद्रामार्फत सातत्याने कौशल्यविकास उपक्रम राबविले जात असून, हे नवीन सर्व्हिस स्टेशन प्रत्यक्ष शिक्षण व दर्जेदार सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande