कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; कृषी विभागाची माहिती
कोल्हापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2026 साठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील काळातही खतांची सुरळीत उपलब्धता राहणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी तसेच संय
कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; कृषी विभागाची माहिती


कोल्हापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2026 साठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील काळातही खतांची सुरळीत उपलब्धता राहणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी तसेच संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही खतांचा तुटवडा नसून, भविष्यातही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते सर्वसमावेशक व प्रभावी नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येत असून, आढळलेल्या त्रुटींनुसार 10 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 2 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

कोणत्याही प्रकारची अनियमित लिंकिंग, जादा दराने विक्री किंवा अनधिकृत साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात करण्यात येईल.

गुण नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक पूर्णवेळ गुण नियंत्रण निरीक्षक नेमण्यात आले असून, पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. जिल्हास्तरावर भरारी पथकाद्वारे नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

तालुकानिहाय खत साठा (मेट्रिक टन मध्ये) पुढीलप्रमाणे - आजरा- 465, बावडा- 474, भुदरगड-1538, चंदगड- 2391, गडहिंग्लज-2362, हातकणंगले-4341,कागल-5144, करवीर-6332, पन्हाळा-2977, राधानगरी-2286, शाहूवाडी-1552, शिरोळ-4183 असा एकूण 34043 मेट्रिक टन साठा आहे.

तालुका गुण नियंत्रण निरीक्षक व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- करवीर –सुनिता वाघमोडे (मो. 9421574854), कागल – नितीन भांडवले (मो. 7588699139), हातकणंगले – नंदकुमार मिसाळ (मो. 8275919596), शिरोळ – अनुप रासकर (मो. 9527897928),पन्हाळा – अभिलाषा गायकवाड (मो. 9405409484), राधानगरी – प्रतिभा पाटील (मो. 9359437318), गगनबावडा – अनिल भोपळे (मो. 9545794976), भुदरगड – सुरज बोचरे (मो. 9270040913), गडहिंग्लज- शुभम लिगाडे (मो. 9860497921), आजरा – दीपक मुळे (मो. 9890590553),चंदगड - धनाजी भगत (मो. 9404864628), शाहूवाडी – ओंकार पवार (मो. 9561301115), जिल्हास्तरीय तक्रार निवारण केंद्र (मो. 9529772521)

तक्रार नोंदणी व संपर्क- खते, बियाणे व कीटकनाशकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर दर्शविलेल्या QR कोड, व्हॉट्सअॅप क्रमांक किंवा वरील तालुका गुण नियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तरावर जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राजेंद्र माने, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सुशांत लव्हटे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद व संभाजी शणवे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

खरीप हंगाम 2026 मध्ये कोणत्याही प्रकारची खतांची कमतरता भासू नये यासाठी जिल्हास्तरावर संरक्षित साठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून किंवा अनावश्यक साठा करण्यासाठी घाईगडबडीत खरेदी करू नये. जिल्ह्यात खतांचा पुरेसा व सुरळीत साठा उपलब्ध आहे.

कोणत्याही प्रकारची कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके इ.) खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के बिल अवश्य घ्यावे. तसेच रासायनिक खतांची खरेदी ही केवळ पीओएस (POS) मशीनद्वारेच करावी व त्यासाठी आधार क्रमांक सोबत ठेवावा. तसेच शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून, जमिनीच्या उपयुक्तता निर्देशांकानुसारच खतांचा संतुलित व शिफारसीनुसार वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अनुदानित खत कंपनीकडून प्राप्त झालेल्या खताचे ॲक्नॉलेजमेंट (Acknowledgement) रिटेलरपर्यंत सात दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावे. अन्यथा विलंब किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर खत (नियंत्रण) आदेश, 1985 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. खतांची अनियमित लिंकींग अथवा चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande