दक्षिण आशियातील सर्वात मोठे एफटीओचा अमरावतीत 10 जूनला शुभारंभ
उद्घाटनासाठी पीएम नरेंद्र मोदीं येण्याची शक्यताअमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : अंबानगरी अमरावतीमधील बेलोरा विमानतळाजवळ साकारात असलेल्या दक्षिण आशियातीलसर्वात मोठ्या उड्डाण प्रशिक्षण केंद्राचे (एफटीओ) चे उद्घाटन आता अगदी जवळ आले आहे. विश्वसनीय सूत्रां
दक्षिण आशियातील सर्वात मोठे एफटीओचा अमरावतीत 10 जूनला शुभारंभ


उद्घाटनासाठी पीएम नरेंद्र मोदीं येण्याची शक्यताअमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : अंबानगरी अमरावतीमधील बेलोरा विमानतळाजवळ साकारात असलेल्या दक्षिण आशियातीलसर्वात मोठ्या उड्डाण प्रशिक्षण केंद्राचे (एफटीओ) चे उद्घाटन आता अगदी जवळ आले आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, या एफटीओचे उद्घाटन येत्या १० जून २०१६ रोजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सूत्रांनुसार, या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जर पंतप्रधान मोदी अमरावतीत आले, तर हा प्रसंग जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यश मानला जाईल. उल्लेखनीय असे की, एअर इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) महाराष्ट्रातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रशिक्षण केंद्राच्या (एफटीओ) ची घोषणा केली होती. हे एफटीओ टाटा ग्रुपची विमान कंपनी एअर इंडियाद्वारे विकसित केले जात असून, औपचारिक शुभारंभ १० जून रोजी होणार आहे. एफटीओ दरवर्षी १८० व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देईल.

वार्षिक १८० कमर्शियल पायलट

एफटीओचे वार्षिक लक्ष्य १८० व्यावसायिक एफटीओचा व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देणे आहे अमरावतीमध्ये उभारण्यात येणारे हे एफटीओ भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे एफटीओ केवळ तरुणांना वैमानिक बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधीच देणार नाही, तर - एअर इंडियाचे जागतिक दर्जाची विमान कंपनी बनण्याचे ध्येयदेखील अधिक मजबूत करेल.

३१ सिगल-इंजिन आणि ३ ट्विन-इंजिन विमाने

एअर इंडियाच्या या एफटीओमध्ये प्रशिक्षणासाठी विमाने - ३१ सिगल-इंजिन आणि ३ ट्विन-इंजिन उपलब्ध असतील. असे वृत्त आहे की, एखाद्या भारतीय विमान कंपनीद्वारे देशात सुरू करण्यात येणारे हे अशा प्रकारचे पहिले मोठे एफटीओ आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) एअर इंडियाला पुढील ३० वर्षांसाठी अमरावतीमधील हे डीजीसीए-मान्यताप्राप्त एफटीओ विकसित आणि - संचालित करण्याचे कंत्राट दिले आहे.

३,००० हून अधिक रोजगार

एमएडीसी आणि एअर इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमामुळेकेवळविमान वाहतूक क्षेत्रात ३,००० हून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत, तर कौशल्यविकास, तांत्रिक सेवा, पुरवठा साखळी आणि लहान व्यवसायांनाही चालना मिळेल यात शंका नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande