सोलापूरात विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले
सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)। तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वीजपुरवठा सतत खंडीत होऊ लागला आहे. लाइट सतत ये-जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोरेगाव पंपहाऊसवरील पंप जळाला. तेथील दुसरा पंप जो
सोलापूरात विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले


सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वीजपुरवठा सतत खंडीत होऊ लागला आहे. लाइट सतत ये-जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोरेगाव पंपहाऊसवरील पंप जळाला. तेथील दुसरा पंप जोडून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा तीनऐवजी पुन्हा चार दिवसांआड केला जाणार आहे.

सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडलेले आहे. तरीपण, उन्हाच्या तडाख्यामुळे शेती पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप सुरू करून पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे शेती फिडरवरील लाइट सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत (लोडशेडिंग) बंद ठेवली जात आहे.

या वेळेत अनेक गावे अंधारात आहेत. आता सोलापूर शहरातील अनेक नगरांचा वीजपुरवठा देखील सतत बंद- चालू होत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने दोन दिवसांत दोनवेळा पाकणी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. त्यामुळे उजनीतून होणारा पाणी उपसा देखील बंद करावा लागला. जुळे सोलापूरमधील ‘एमबीआर’वरही विद्युतपुरवठ्याचा परिणाम झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande