नाशिक - खुटवडनगर चौफुलीवर डंपरच्या धडकेत २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू
नाशिक , 18 एप्रिल (हिं.स.)। सिडको येथील खुटवडनगर सिटूभवन चौफुलीवर शनिवारी (दि. १८ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजता सुमारास झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पायल गोसावी (रा. खुटवडनगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. त्या दुचाकी (क्र. एमएच १८
22-year-old woman killed


नाशिक , 18 एप्रिल (हिं.स.)। सिडको येथील खुटवडनगर सिटूभवन चौफुलीवर शनिवारी (दि. १८ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजता सुमारास झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पायल गोसावी (रा. खुटवडनगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. त्या दुचाकी (क्र. एमएच १८ सीएच ३८८०) वरून खुटवडनगरहून आयटीआय सिग्नलकडे जात होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायवा डंपर (क्र. एमएच ०४ जीसी ०९८८) हा शिवशक्तीनगरकडून येत होता. चौफुलीवर आल्यानंतर डंपरने प्रथम स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १५ जीएल ६१८३) ला धडक दिली. या कारमधील चार जण सुरक्षित राहिले, मात्र वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर बाजूने जात असलेल्या पायल यांच्या दुचाकीला धडक बसली. धडकेनंतर त्या डंपरच्या चाकाखाली अडकल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर डंपरने आणखी एका दुचाकी व एका चारचाकी वाहनाला धडक दिली. पुढे जाऊन डंपर एका झाडावर जाऊन थांबला. त्यामुळे पुढील मोठा अपघात टळला. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही नागरिकांनी मयत मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी काही वेळ रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande