
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)।
लातूर शहरातून इतरत्र जाण्यासाठी सर्व रस्ते चांगले झाल्यामुळे वाहतूकीस चांगली सोय निर्माण झाली असली तरी वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. दरम्यान, यामध्ये नांदेड रोड, निलंगा रोड आणि तुळजापूर रोडवर मागील काळात झालेल्या अपघातांमुळे या महामार्गांवर प्रादेशिक परिवहन विभागाने अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण केले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ अपघात प्रवण क्षेत्र हे निलंगा रोड आणि निलंगा तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यांवर असून नांदेड रोडवर १० तर तुळजापूर रोडवर ५ ठिकाणे धोकादायक ठरविण्यात आले आहेत. तरी याठिकाणी होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रडारने समृद्ध असलेल्या आधुनिक वाहनांद्वारे सर्वेलन्स करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत लातूर शहरातून चारही दिशांनी मोठ्या शहरांकडे जाणारे महामार्ग हे टकाटक झाले आहेत. यामध्ये लातूर-निलंगा, लातूर-नांदेड, लातूर-तुळजापूर आणि लातूर-आंबाजोगाई, लातूर-बार्शी या रस्त्यांचा समावेश होतो. दरम्यान, रस्ते चांगले आणि विस्तृत झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हाभरात दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय अपघातात मरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. वाढत्या अपघाताच्या अनुषंघाने प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील विविध महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रांचा शोध घेण्याता आला. यामध्ये बहुतांश अपघात है नदिड, निलंगा अन् तुळजापूर महामागाँवर झालेले असल्याने प्राधान्याने याठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात २८ अपघातप्रवण क्षेत्र आढळून आले आहे. तरी या तीनही महामार्गावर आधुनिक तंत्रज्ञान 'रडार असलेल्या वाहनातून हेल्मेट नसणे, सिटबेल्ट नसणे, दुचाकीवर ट्रिपल सिट जाणे, अतिवेगाने (ओव्हर स्थिडिंग) वाहने (ओव्हर स्पिर्डिंग) वाहने चालविणे यावर लक्ष ठेवले जात आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनावर ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis