
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील अनेक भागात भाजपाने स्वच्छतागृह उभारले आहेत. मात्र जागे अभावी राजीव गांधी चौक येथे स्वच्छतागृह उभारणी होऊ शकली नाही. नागरीकांची गजर लक्षात घेऊन प्रभाग 18 चे नगरसेवक अनंत गायकवाड यांनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन राजीव गांधी चौक परिसरात तातडीने स्वच्छातागृह उभारणीसाठी जागा देऊन त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी निवेदना व्दारे केली आहे.
या निवेदनाची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर राजीव गांधी चौक परिसरात स्वच्छतागृह उभारणीसाठी पालकमंत्री यांनी सकारत्मकता दर्शवली असल्याचे नगरसेवक अनंत गायकवाड यांनी सांगीतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis