खोपोलीत प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर कारवाई; पान टपरी चालक अटकेत
रायगड, 18 एप्रिल, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पान टपरी चालकाला अटक केली आहे. ही कारवाई 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास खालची खोपोली येथील बाजार
Action taken against sale of banned pan masala in Khopoli; Pan tapri driver arrested


रायगड, 18 एप्रिल, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पान टपरी चालकाला अटक केली आहे. ही कारवाई 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास खालची खोपोली येथील बाजारपेठ परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल साईश्रवणच्या बाजूला असलेल्या ‘मे. राजेश पान शॉप’ या टपरीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी आरोपीकडे एकूण ५,५२६ रुपयांच्या किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करत हे पदार्थ ग्राहकांना विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

सदर प्रकरणी आरोपीला त्याच दिवशी रात्री सुमारे 9.20 वाजता अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अन्नभेसळ प्रतिबंधक अधिनियम, 1954 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गागरे हे करीत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande