लातूरमध्ये मोठी कारवाई: ८.५९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त, एक आरोपी अटकेत
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात मानवी आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध साठा व वाहतुकीवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८.५९ लाख रु
पोलीस कारवाई


लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात मानवी आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध साठा व वाहतुकीवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांबाळा पाटी परिसरात सापळा रचण्यात आला. या वेळी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनर (क्रमांक MH-24 CD-3593) वाहन थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा आढळून आला. त्यामध्ये रत्ना 3000 तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, बाबा नवरत्न पानमसाला, आर.आर. पानमसाला आणि रजनीगंधा यांसारख्या पदार्थांचा समावेश होता.

या प्रकरणात संजय काशिनाथ कन्ना (वय 45, रा. उस्तुरी, ता. निलंगा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत एकूण अंदाजे 2,59,560 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा आणि 6 लाख रुपये किमतीची वाहन जप्त करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, तसेच इतर अधिकारी व अंमलदार आणि कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande