ठाणे - आनंद नगरमधील बुद्धविहाराचा कायापालट होणार
ठाणे, 18 एप्रिल, (हिं.स.)। गेली अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहा
Anand Nagar's Buddhavihar Set for Transformation


ठाणे, 18 एप्रिल, (हिं.स.)। गेली अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरुवात होणार आहे.

पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहाराची अवस्था खराब झाली होती. त्यातच गेली अनेक वर्षे पुनर्बांधणीचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेऊन निधी गोळा करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १९ एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होत आहे.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे,माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनकर, उपाध्यक्ष आनंद कांबळे, राहुल लोंढे, वृक्षाली जाधव - दळवी, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजीनदार राजू साबळे, अमोल जोशी, दिलीप जाधव, नितीन दुधसागर, सुनील सौंदाणे, भरत उबाळे, सुनील कदम प्रवीण झेंडे आणि इतर मेहनत घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande