अवघ्या तीन तासांत चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा, मुद्देमालासह आरोपी जेरबंद
जळगाव , 18 एप्रिल (हिं.स.) पाचोरा पोलिसांकडून अवघ्या तीन तासांत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत आरोपीस मुद्देमाल सह अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९४,५०० रुपयांचे ए.सी. तसेच सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी
अवघ्या तीन तासांत चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा, मुद्देमालासह आरोपी जेरबंद


जळगाव , 18 एप्रिल (हिं.स.) पाचोरा पोलिसांकडून अवघ्या तीन तासांत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत आरोपीस मुद्देमाल सह अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९४,५०० रुपयांचे ए.सी. तसेच सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, १६ एप्रिल रोजी पाचोरा पोलिसात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नय्युम जहांगिर देशमुख (व्यवसाय इलेक्ट्रिक दुकान, रा. आक्सानगर, जारगाव ता. पाचोरा) यांच्या गोडाऊनमधून गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. (किंमत अंदाजे ९४,५०० रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने तपास सुरू केला व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमान नगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन ए.सी. जप्त करण्यात आले. याचप्रमाणे, पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असलेल्या ३०,००० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचाही उलगडा करण्यात आला आहे. अवघ्या तीन तासांत दोन चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील सफौ विलास पाटील, पोहेकॉ वसीम शेख, पोहेकॉ श्रीकांत गायकवाड, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ संदीप राजपूत, पोकॉ गणेश कुंवर यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande