नांदेड : शासकीय कामांचा आढावा; तत्काळ अंमलबजावणीचे आमदारांचे निर्देश
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : नांदेड तालुक्यातील शासकीय कामे प्रामुख्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली
अ


नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : नांदेड तालुक्यातील शासकीय कामे प्रामुख्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत तालुक्यातील सर्व तालुका स्तरीय अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, अन्न नागरी पुरवठा, सामाजिक सुरक्षा योजना, पाणीटंचाई, वीजपुरवठा, कृषी विषयक बाबी, खत-बियाणे पुरवठा, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान, नैसर्गिक आपत्ती अनुदान, विशेष सहाय्य अनुदान वाटप, ई-फेरफार, जलजीवन मिशन, महावितरण, तसेच कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

दोन्ही आमदारांनी अधिकाऱ्यांना कामात शिस्त व गती ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच अडचणी उद्भवल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, भूमिअभिलेख व जलसंधारण विभागाचे अधिकारी, कृषी, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग तसेच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande