रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाची शक्यता
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून, रविवारी (दि. १९) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार २० आणि २१ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाची शक्यता


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून, रविवारी (दि. १९) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार २० आणि २१ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांनी सतर्क राहावे, अशा सूचना दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढलेला आहे. जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आहे तर किमान तापमान २४ अंशावर स्थिर आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सायंकाळी हलका वारा असतो. दरम्यान, १९ एप्रिलपासून पावसाला सुरुवात होऊन २० व २१ एप्रिलला पावसाचा जोर वाढू शकतो. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी परिपक्व झालेला आंबा पावसापूर्वी लवकरात लवकर काढून घ्यावा, काढलेली फळे सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत. तसेच आंबा काढताना तो ८० ते ८५ टक्के पक्वतेचा असतानाच काढावा. साका टाळण्यासाठी काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतरच करावी, अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande