
चंद्रपूर, 18 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या वसुमना पंत यांचे स्वागत व सत्कारही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे होणार आहे.
कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव