
पोलिसांकडून घटनाक्रमाची बारकाईने पडताळणी सुरूअमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) । संपूर्ण राज्यात सर्वत्र खळबळ उडवणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने चौकशीदरम्यान स ांगितले की, पहिल्या ब्रेकअपनंतर तो 'प्लेबॉय' बनला होता. एवढेच नाही तर, चार भिंतीआडचे कृत्य जबरदस्तीने नव्हे तर त्यांच्या समंतीनेच होते, असे अयानने चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण मानसिक आजारापेक्षा एका विशिष्ट मानसिकतेशी आणि जीवनशैलीशी अधिक संबंधित आहे. अयान अहमद सोशल मीडियावर सक्रिय होता आणि त्याची जीवनशैलीदेखील या प्रकरणात एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आली आहे.
कठोरा रोडवरील 'तो' फ्लॅट आता या प्रकरणाचा मुख्य 'हॉटस्पॉट' ठरला असून, त्याठिकाणी चालणाऱ्या कुकृत्याची भीषणता पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. एसआयटीने गुरुवारी कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटमध्ये जाऊन क्राईम सीन रिक्रिएट केला. धक्कादायक बाब म्हणजे, मानव सुगंधे या आरोपीने स्वतःच्या नावाने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तो अयान अहमदला 'तासिका तत्त्वावर' मुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी पुरवत होता. अयानचा मोबाईल फोनचा मोठा व्यवसाय होता आणि तो इंस्टाग्रामवरील पेड प्रमोशनच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळवत असे. त्याचे सुमारे 18,000 फॉलोअर्स होते, ज्यामुळे सोशल मीडियावर मीडियावर त्याची वर्चस्व होते. मोठी कमाई असूनही तो मित्र आणि कुटुंबीयांकडून पैसे उधार घेत राहिला, आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो त्या पैशांचा वापर आपली आलिशान आणि ऐशोआरामी जीवनशैली कायम ठेवण्यासाठी करत होता. अयान अहमद सोशल मीडियाद्वारे महिलांशी संपर्क साधायचा आणि हळूहळू त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो सुमारे चार ते पाच महिने घालवायचा, जेणेकरून त्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसेल. एकदा काविश्वासनिर्माणझाला आहे असे त्याला वाटले की, तो त्यांच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करायचा किवा त्यासाठी दबाव टाकायचा.
मानव असा बनला राक्षस
आर्वी येथील मानव हा येथे बीबीए करत आहे. पीयूष नामक तरुणदेखील यापूर्वी तो फ्लॅट अशाच कामासाठी उपलब्ध करून द्यायचा. त्यानंतर त्याने अमरावती सोडले. पीयूषच्या ओळखीतील व्यक्तीने अयानला मानव त्याचा भाड्याचा फ्लॅट तासाप्रमाणे देतो, असे सूचविले. त्यानंतर अयान याने मानवशी संपर्क साधला. त्यानंतर तेथे एक हजार रुपये प्रति तासाप्रमाणे विकृतीचा खेळ सुरू झाला.-------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी