अमरावती - अयानला लव्हगुरुच्या टिप्स; आरोपीनं मुलींना कसं अडकवलं जाळ्यात?
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) - जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपास वेग आला आहे. या लैंगिक शोषण प्रकणात नवीन धक्कादायक खुलासे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहेत. मुख्य आरोपी अयान अहमदने मुलींना जाणीवपूर्वक जाळ्यात अडकवून त्
मुलींशी हाय हॅलो नको तर...; अयानला लव्हगुरुच्या टिप्स; आरोपीनं मुलींना कसं अडकवलं जाळ्यात? पोलीस आता लव्ह गुरुच्या शोधात


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) - जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपास वेग आला आहे. या लैंगिक शोषण प्रकणात नवीन धक्कादायक खुलासे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहेत. मुख्य आरोपी अयान अहमदने मुलींना जाणीवपूर्वक जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण करायचा. त्यासाठी त्याने एका तथाकथित 'लव्ह गुरू'ची मदतही घेतली होती.

आरोपीने त्याचा मित्र मानव सुगंधे याच्या कठोरा रोडवरील एका भाड्याच्या फ्लॅटचा सात ते आठ वेळा वापर केला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी फ्लॅट मालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. फ्लॅट मालकाला या कृत्यांची माहिती होती की नाही, याची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनुसार आरोपी अयान तरुणींशी संभाषण सुरू करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरत असायचा. त्याला एका तथाकथित 'लव्ह गुरू'कडून सल्ले मिळाले होते. त्याने अयानला महिलांना कसं जाळ्यात घ्यायचं हे शिकवलं होतं. यामुळे पोलीस आता या 'लव्ह गुरू'च्या शोधात आहेत.

तो अगदी सुरुवातीपासूनच थेट प्रश्न विचारायचा “हाय-हॅलो बोलायचं नाही, तू तीच व्यक्ती आहेस का जिला मी तिथे भेटलो होतो?” अशा प्रकारे अयान आपला संवाद सुरू करायचा. त्यानंतर मुलगी स्वत: हून तिच्या सर्व माहिती द्यायची. असं करत करत अयान मुलीला तिला आपल्या जाळ्यात अडकवत. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करून, मग त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. अयान केवळ सोशल मीडियावर 'हाय-हॅलो' करण्यावर विश्वास ठेवत नव्हता. दोन वर्षापूर्वी एका तरुण गुरूने त्याला संवादाचे कौशल्य शिकवले होते.

'आप वही हो ना? अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नाने तो संवादाची सुरुवात करत असायचा. समोरची मुलगी 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर न देता सविस्तर बोलायची. तेथूनच ती अयानच्या जाळ्यात अडकण्याची. इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स असलेल्या या नराधमाने सोशल मीडियाचा वापर 'हंटिंग ग्राउंड 'सारखा केला. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका टू-बीएचके फ्लॅटमध्ये अयानने काही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande