रत्नागिरी : कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत पात्रता पडताळणी करणार
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकारी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात श्री. डॉ. सामंत यां
रत्नागिरी : कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत पात्रता पडताळणी करणार


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकारी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात श्री. डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गेली अनेक वर्षे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतची योजना रहिवाशांना समजावून सांगणे आवश्यक आहे. गरीब लोकांना घरे देऊन त्यांची जीवनशैली सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. याकरिता पात्रता पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतच्या शासन निर्णयाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जागा, अंगणवाडी, बालवाडी एकाच आवारात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम प्रकल्प होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, रत्नागिरी पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्य प्रकाश रसाळ, कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक तळेकर मॅडम उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande