छ. संभाजीनगर - अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)। राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने धाडी टाकून सात गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही केली आहे. भेसळयुक
छ. संभाजीनगर - अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई


छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)। राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने धाडी टाकून सात गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही केली आहे. भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांविरुद्ध कारवाई साठी खडक धोरण अवलंबले असून, छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात ७ ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

प्रशासनाने शहर आणि ग्रामीण भागात शोधमोहीम राबवून कारवाई केली व त्यांचे दुकान ,गाळे सील केले.

जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत हजारो-लाखो रुपयांमध्ये असून, बंदी असतानाही या मालाची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी संबंधित सातही विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध BNS कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त श्री. एस. आर. करकाळे आणि सहाय्यक आयुक्त श्री. विवेक पाटील व श्री. दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वर्षा रोडे, श्रीमती सुलक्षणा जाधवर, श्रीमती ज्योत्सना जाधव, श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्री. प्रशांत अजिंठेकर, श्री. प्रशांत कुचेकर, श्री. फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande