
नांदेड, 18 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यात मागील दीड वर्षातील गुन्हेगारीत झालेल्या घट व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. पुढील काळातही जिल्ह्यात शांतता राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 20 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis