
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) - उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर / वाराणसी दरम्यान ३४ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - सुलतानपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (१८ सेवा)
गाडी क्रमांक 04211 ही साप्ताहिक विशेष दिनांक २१.०५.२०२६ ते १६.०७.२०२६ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४:३५ वाजता सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी २३:०० वाजता पोहोचेल (९ सेवा).
गाडी क्रमांक 04212 साप्ताहिक विशेष दिनांक २०.०५.२०२६ ते १५.०७.२०२६ पर्यंत दर बुधवारी सुलतानपूर येथून ०४:०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता पोहोचेल. (9 सेवा).
थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - वाराणसी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (१६ सेवा)
गाडी क्रमांक 04225 साप्ताहिक विशेष दिनांक २२.०५.२०२६ ते १०.०७.२०२६ पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४:३५ वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी ०२:०५ वाजता पोहोचेल (८ सेवा).
गाडी क्रमांक 04226 साप्ताहिक विशेष दिनांक २१.०५.२०२६ ते ०९.०७.२०२६ पर्यंत दर गुरुवारी वाराणसी येथून ०१:३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता पोहोचेल (८ सेवा).
थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी.
गाडी क्रमांक 04211/ 04212 आणि गाडी क्रमांक 04225/ 04226 साठीची संरचना: १४ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर व्हॅन.
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 04211 आणि गाडी क्रमांक 04225 साठी बुकिंग सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी