
* ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांची शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचा निर्णय एकमताने महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेला आजीव अध्यक्ष जय कवळी, महासचिव भारतकुमार व्हावळ, कोषाध्यक्ष मनोज पिंगळे, उपाध्यक्ष पंकज भारसाकळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंखे, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, ॲड. शेख अकबर, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, कॅप्टन शाहूराज बिराजदार, विजय सोनवणे, कार्यकारी सचिव शैलेश ठाकूर, प्रशासकीय सचिव महेश सकपाळ, विभागीय सचिव मयूर बोरसे, मंगेश कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेनंतर बोलताना महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर म्हणाले की, आज महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. महाराष्ट्रातील बॉक्सिंगच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक योजना बॉक्सिंग असोसिएशनने करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ही शंभर वर्ष पूर्वीपासूनची अधिकृत अशी असोसिएशन आहे. राज्यातील बॉक्सिंगला वैभवाचे दिवस यावे याकरिता सर्व जिल्हा प्रतिनिधींनी आज निश्चय केला. बॉक्सिंग खेळाडूंच्या संदर्भात, बॉक्सिंग कोचेचच्या संदर्भात, विद्यार्थ्यांकडून कमी फी घेण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत झाले. बॉक्सिंग असोसिएशनच्या अनेक अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांना शिष्टमंडळ भेटण्याचे बैठकीत ठरले आहे. विशेष म्हणजे ८ विभाग आहेत, त्या ८ विभागात विभागीय मोठ्या रकमेच्या चांगल्या स्पर्धा घेण्याचे ठरले. अखेरीस राज्यस्तरीय एक मोठी स्पर्धा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन घेईल अशा प्रकारचेही निर्णय झाल्याची माहिती आ. दरेकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी