
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) । नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पवित्र देवभूमी माहूरगड येथील श्री दत्त शिखर संस्थानास भेट देऊन दर्शन घेतले.
या वेळी त्यांनी संस्थानचे नवीन महंत श्री धनेश्वर भारती ऊर्फ योगी श्याम भारती महाराज यांची भेट घेतली. तसेच महंत परंपरेतील 30 वे महंत परमपूज्य मधुसूदन भारती महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री अतुल सावे यांनी विविध भेटीगाठींवर भर दिला. माहूरगड हे अत्यंत पवित्र क्षेत्र असून येथे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच या ठिकाणाहून नवीन कार्यासाठी ऊर्जा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis