
रायगड, 18 एप्रिल (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 जानेवारी 2025 ते 16 एप्रिल 2026 या कालावधीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारामुळे मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी विवाह केल्याचे समोर आले असून मुलीने अलीकडेच एका नवजात मुलीला जन्म दिला आहे.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 80/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 64(2) तसेच कलम 351(2) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 च्या कलम 4 व 6 नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उ.नि. प्राची पांगे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)