दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा; पुणे महापालिकेचा उपक्रम
पुणे, 18 एप्रिल (हिं.स.) : दिव्यांग मुलांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते सर्वसाधारण मुलांप्रमाणेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने
Ghj


पुणे, 18 एप्रिल (हिं.स.) : दिव्यांग मुलांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते सर्वसाधारण मुलांप्रमाणेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, महापालिका नेहमीच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कौशल्य यांना योग्य व्यासपीठ मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, क्रीडा स्पर्धा केवळ पदक जिंकण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढ आणि समाजात समावेशकतेचा संदेश देण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. भविष्यात अशा उपक्रमांचा अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपायुक्त पंकज पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. तर प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य तुषार सहाणे तसेच विविध शाळांचे शिक्षक, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande