जिद्द, तंत्रज्ञान आणि शेती – दर्शना दामले यांची यशस्वी कहाणी
रायगड, 18 एप्रिल (हिं.स.)। मुंबईच्या झगमगत्या वातावरणातून बाहेर पडत अंबरनाथ तालुक्यातील जांभूळघर येथील श्रीमती दर्शना आनंद दामले यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. माहेरी शेतीची कोणतीही पार्श्व
**मुंबईच्या ग्लॅमरकडून अंबरनाथच्या काळ्या मातीकडे – दर्शना दामले यांची यशोगाथा**  मुंबईच्या झगमगत्या वातावरणातून बाहेर पडत अंबरनाथ तालुक्यातील जांभूळघर येथील श्रीमती दर्शना आनंद दामले यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. माहेरी शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही केवळ निसर्गप्रेम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेतीत यशस्वी वाटचाल सुरू केली. “इच्छा तिथे मार्ग” या उक्तीला साजेसा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.  २००९ साली कृषी विभागामार्फत झालेल्या युरोप दौऱ्याने त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि स्पेन येथे त्यांनी वाइनरी तंत्रज्ञान, सौर ऊर्जा आणि बायोगॅस यांचा अभ्यास केला. या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी आपल्या अंबरनाथमधील दोन हेक्टर शेतीत यशस्वी अवलंब केला. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात विजेऐवजी संपूर्ण कामकाज सौर ऊर्जेवर चालते, जे शाश्वत शेतीचे उत्तम उदाहरण आहे.  दर्शनाताईंनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत आंबा, नारळ, काजू, पेरू, चिकू, पपई आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. पशुपालनातही त्यांनी ‘मुक्त संचार गोठा’ पद्धतीचा अवलंब करून १० गाई आणि ५ म्हशींचे संगोपन केले आहे. आंध्रप्रदेशातील ‘पुगनूर’ जातीच्या दुर्मिळ गाईंचा समावेश त्यांच्या शेतात विशेष आकर्षण ठरतो. रासायनिक खतांना फाटा देत त्या सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतात.  शेतीसोबतच ‘गायत्री कुटुंब समुपदेशन केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे त्या इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.  दर्शनाताईंची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या बळावर शेतीतही मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.


रायगड, 18 एप्रिल (हिं.स.)। मुंबईच्या झगमगत्या वातावरणातून बाहेर पडत अंबरनाथ तालुक्यातील जांभूळघर येथील श्रीमती दर्शना आनंद दामले यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. माहेरी शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही केवळ निसर्गप्रेम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेतीत यशस्वी वाटचाल सुरू केली. “इच्छा तिथे मार्ग” या उक्तीला साजेसा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

२००९ साली कृषी विभागामार्फत झालेल्या युरोप दौऱ्याने त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि स्पेन येथे त्यांनी वाइनरी तंत्रज्ञान, सौर ऊर्जा आणि बायोगॅस यांचा अभ्यास केला. या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी आपल्या अंबरनाथमधील दोन हेक्टर शेतीत यशस्वी अवलंब केला. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात विजेऐवजी संपूर्ण कामकाज सौर ऊर्जेवर चालते, जे शाश्वत शेतीचे उत्तम उदाहरण आहे.

दर्शनाताईंनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत आंबा, नारळ, काजू, पेरू, चिकू, पपई आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. पशुपालनातही त्यांनी ‘मुक्त संचार गोठा’ पद्धतीचा अवलंब करून १० गाई आणि ५ म्हशींचे संगोपन केले आहे. आंध्रप्रदेशातील ‘पुगनूर’ जातीच्या दुर्मिळ गाईंचा समावेश त्यांच्या शेतात विशेष आकर्षण ठरतो. रासायनिक खतांना फाटा देत त्या सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतात.

शेतीसोबतच ‘गायत्री कुटुंब समुपदेशन केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे त्या इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

दर्शनाताईंची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या बळावर शेतीतही मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande