नांदेड महानगरपालिकेच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा; मूलभूत सुविधांवर भर
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती तसेच इतर मूलभूत स
अ


नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस नियोजनावर भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान मंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागांना दिलेल्या उद्दिष्टांची ठरवलेल्या कालावधीत पूर्तता करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. शहराचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून शहरातील सुविधा अधिक सक्षम करण्यावर या आढावा बैठकीत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande