
डोंबिवली, 18 एप्रिल (हिं.स.)।
शुक्रवारी लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेचा डोंबिवलीतील शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीने निषेध आंदोलन केले. पूर्वेकडील इंदिरा चौकात शिवसेनेच्या शेकडो महिला रणरागिणी एकत्रित येऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा निषेध केला. शिवसेनेच्या महिलांनी लोकसभेतील विरोधक हे काम महिला विरोधी आहेत असे ठासून सांगितले. या महिला विरोधी पक्षांना देशातील महिला नक्की धडा शिकवतील असा पण केला.
महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नांना विरोध करणाऱ्यांची मानसिकता पुरुषी अहंकाराची असल्याचे सांगत त्यांनी आंदोलन केले. नारी शक्ती वंदन विधेयक महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करीत काँग्रेसचा खेळ उघड झाला, नारी सन्मानावर वार झाला, सत्तेचा हाव अन् खुर्चीचा हाव, काँग्रेसने केला घाणेरडा डाव अशा असंख्य घोषणांनी इंदिराचौक दणाणून सोडला.
यावेळी लता पाटील (जिल्हा संघटक), कविता गावंड (जिल्हा संपर्क संघटक), शीतल लोके (उपजिल्हा संघटक), किरण मोंडकर (उपजिल्हा संघटक), श्वेता मोहिते (कल्याण डोंबिवली महासंघटक) केतकी पोवार (शहर संघटक), स्वाती हिरवे (शहर संघटक), अस्मिता खानविलकर (विधान सभा संघटक), रश्मी घावणे (विधान सभा संघटक), उज्वला भोसले (विधान सभा संघटक) यांच्यासह महिला रणरागिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसने देशाचं कधीच चांगलं पहिलं नाही. महिलांचा नेहमीच विरोध केला. आताही त्यांनी महिला बिल विरोधात मतदान केले. संसदेत बसायची काँग्रेस पक्षाची लायकीच नाही. देशातील रणरागिणी महिला काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील. काँग्रेसने महिलांवर गदा आणली आहे. महिलांच्या मान सन्मानाचा अपमान केला आहे. महाराष्ट्रातील महिला हे कधीच सहन करणार नाहीत. महिलांच्या हक्कासाठी अशी कितीही आंदोलने करावी लागली तरी शिवसेनेच्या रणरागिणी तयारीतच असतील. महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे असे शिवसेना (शिंदे गट) महिला मोर्चा प्रमुख लता पाटील यांनी यावेळी सांगितले.
तर कविताताई म्हणाल्या काँग्रेसची फेक नॅरेटीव्ह पसरविण्याची रणनीतीच आहे. यापूर्वीही संविदा खतरेमें अस बोलून तसा फेक नॅरेटीव्ह पसरविला. आताही तेच पालपुद सुरू आहे. कोणतं संविधान खतरेमे आहे. महिला आरक्षण रद्द करण्याचं घाणेरडे काम केलं आहे. काँग्रेसमुळे महिलांच्या सन्मानच बिल पास झालं नाही त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला महिला नक्कीच हद्दपार करून दाखवतील. शिवसेना नेहमी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यास पाठींबा देत आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi