नाशकात शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने काँग्रेस विरोधात आंदोलन
नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.)। लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या ''नारी शक्ती वंदन विधेयका'' ला काँग्रेसकडून दर्शविण्यात आलेल्या विरोधाच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिला सक्षमीकरण
Shiv Sena Shinde protests


नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.)।

लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या 'नारी शक्ती वंदन विधेयका' ला काँग्रेसकडून दर्शविण्यात आलेल्या विरोधाच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या या ऐतिहासिक निर्णयाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. अशा स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना महिला आघाडीने नेहमीच महिलांच्या सन्मान, हक्क आणि सशक्तीकरणासाठी ठाम भूमिका घेतली आहे आणि पुढेही घेत राहील. पश्चिमच्या जिल्हाप्रमुख अस्मिता देशमाने, मंगला भास्कर जिल्हाप्रमुख दिंडोरी लोकसभा, संगीता पाटील जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख नाशिक पश्चिम शिल्पा चव्हाण,उपजिल्हाप्रमुख सुलोचना मोहिते,उपजिल्हाप्रमुख ज्योती फड उपमहानगर प्रमुख मोनिका मुथा, प्रभाग प्रमुख मंगला पाटील, उपजिल्हाप्रमुख नाशिक पूर्व ज्योती देवरे आणि नाशिक व पश्चिमच्या पदाधिकारी उपस्थित होत्या..

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपण सर्व मिळून महिलांच्या हक्कांसाठी लढा अधिक बळकट करूया.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande