परतवाडा येथे अयान अहमदच्या घराजवळील दुकाने रिकामी
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) । अमरावती जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण व त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल प्रकरणाला आता नवे वळण आले असून मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अयान अहमदच्या घराजवळ असलेल्या व्यापाऱ्यांनी आ
लैंगिक शोषण आरोपी अयान अहमदच्या घराजवळील दुकाने रिकामी


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) । अमरावती जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण व त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल प्रकरणाला आता नवे वळण आले असून मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अयान अहमदच्या घराजवळ असलेल्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

विशेषतः कापड व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपले साहित्य, फर्निचर आणि माल काढून घेत जागा खाली करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दरम्यान, काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. संबंधित आरोपीचे घर तात्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सद्यस्थितीत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande