सोलापुरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन
सोलापूर, 18 एप्रिल (हिं.स.) । भगवान परशुराम जयंतीनिमित्त जुळे सोलापूर येथे 19 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा उत्सव मोठ्या
Ksks


सोलापूर, 18 एप्रिल (हिं.स.) । भगवान परशुराम जयंतीनिमित्त जुळे सोलापूर येथे 19 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून मुख्य कार्यक्रम के.एल.ई. स्कूल येथे होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सायंकाळी 5 वाजता सुरू होणारी ही मिरवणूक के.एल.ई. स्कूल येथून सुरू होऊन भारती विद्यापीठ, चैतन्य मार्केट, गोविंद श्री मंगल कार्यालय मार्गे पुन्हा के.एल.ई. स्कूल येथे समाप्त होणार असल्याची माहिती ब्राह्मण समाजाचे राज्य समन्वयक काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली.

यंदाच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ असणार आहेत. या चित्ररथांवर समाजातील पाच ज्येष्ठ समाजसेवकांची माहितीही सादर केली जाणार आहे. तसेच सुमारे 500 हून अधिक तरुण-तरुणींचा ड्रेसकोडमधील लेझीम पथक या मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरणार आहे.या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे, असे आयोजकांनी सांगितले.सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या परशुराम जयंती मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेस स्वागताध्यक्ष अजय कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी, शर्वरी रानडे, विक्रम डोणसळे, रवींद्र नाशिककर आदी उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande