सोलापूर–हैद्राबाद विमानसेवेचा दिमाखात प्रारंभ
पहिल्याच दिवशी सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद सोलापूर, 18 एप्रिल (हिं.स.)। शहराच्या विकासाला नवे पंख देत सोलापूर ते हैद्राबाद ही विमानसेवा ''फ्लाय ९१'' (Fly91) एअरलाईन्सच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात सुरू झाली. शुक्रवारी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत
Jsjs


पहिल्याच दिवशी सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

सोलापूर, 18 एप्रिल (हिं.स.)। शहराच्या विकासाला नवे पंख देत सोलापूर ते हैद्राबाद ही विमानसेवा 'फ्लाय ९१' (Fly91) एअरलाईन्सच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात सुरू झाली. शुक्रवारी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत प्रवाशांनी जल्लोषात केले, तर पहिल्याच दिवशी विमानाने आकाशात झेप घेताच सोलापूरकरांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

या उद्घाटन सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'राऊंड टेबल इंडिया' (सोलापूर शाखा) उपक्रम. सावळेश्वर येथील न्यू समता प्रशालेतील ७ मुली, ३ मुले आणि एका शिक्षकाला आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाची सुवर्णसंधी देण्यात आली. पहिल्यांदाच विमानात बसलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुतूहल या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.सोलापूर विमानतळावर 'फ्लाय ९१'च्या वतीने प्रवाशांना बोर्डिंग पास वाटून आणि केक कापून औपचारिक स्वागत करण्यात आले. सोलापूर विकास मंच आणि मिष्टी मिठाई यांच्या वतीने सर्व प्रवाशांना नाश्त्याच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले. प्रवासाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या आदरातिथ्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर विकास मंचने नागरी विमानसेवेसाठी केलेल्या अथक पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या विमानसेवेमुळे सोलापूर आता हैद्राबादमार्गे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. याचा थेट फायदा सोलापूरच्या कापड उद्योग, वैद्यकीय पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला होणार असून, आगामी काळात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande