अहमदपुरात ' श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात' विद्यार्थ्याला मारहाण ; व्हिडिओ व्हायरल
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)। शहरातील टेंबुर्णी रोडवरील सैनिक कॉलनी भागात असलेल्या ''श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात'' एका मतिमंद विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मारहाण


लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)।

शहरातील टेंबुर्णी रोडवरील सैनिक कॉलनी भागात असलेल्या 'श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात' एका मतिमंद विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारोती शेनरोड (वय १८ वर्ष, रा. चाकूर) हा तरुण गेल्या १५ वर्षांपासून या विद्यालयात वास्तव्यास आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारत असल्याचे दिसत आहे, तर दुसरा कर्मचारी चक्क त्या मूकबधिर मुलाचा गळा दाबत असल्याचे दिसून येत आहे. मारहाणीमुळे भयभीत असलेला तो मतिमंद मुलगा स्वतःचे डोके स्वतःच हाताने आपटून घेत असल्याचे पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.

या प्रकरणावर श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयाशी संपर्क साधला असता मुलगा 'हायपर' होऊन दुसऱ्या मुलांना चावा घेऊन अंगावर धावत जाऊन मारत होता त्यामुळे त्याला आवरण्यासाठी हे केले गेले, असे सांगण्यात आले आहे

या घटनेची गंभीर दखल अहमदपूर पोलिसांनी घेतली आहे. अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओबाबत समाज कल्याण अधिकारी, लातूर यांच्याकडे पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागाचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande