रेशीम उद्योग शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा : आ. अभिमन्यु पवार
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)।औसा तालुक्यातील सर्व गावांतील रेशीम उद्योग करणारे शेतकरी तसेच ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत सीआरपी आणि कृषी सखी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेशीम शेतीचा विस्तार कसा करता येईल याबाबत शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घे
आमदार अभिमन्यू पवार


लातूर, 18 एप्रिल (हिं.स.)।औसा तालुक्यातील सर्व गावांतील रेशीम उद्योग करणारे शेतकरी तसेच ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत सीआरपी आणि कृषी सखी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेशीम शेतीचा विस्तार कसा करता येईल याबाबत शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

रेशीम उद्योग हा बारमाही उत्पन्न देणारा असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी, विशेषतः महिलांनी या उद्योगात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या.

यावेळी महिला एग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. शोभा पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा रेशीम अधिकारी, तहसीलदार (औसा व कासार शिरसी), सहाय्यक गटविकास अधिकारी (औसा/निलंगा), तालुका कृषी अधिकारी (औसा/निलंगा) तसेच ‘उमेद’ अंतर्गत CC, CRP आणि कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande