
परभणी, 18 एप्रिल (हिं.स.) । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार (दि. 20) रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील साई नाट्यगृह येथे प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक) यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण राहणार असून, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत आणि अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दार्थ एडके, रामराव बोबडे, डॉ. सुरेश हिवाळे, गंगाधर अवचार, गजानन साळवे, सुमेध आवटे, आबासाहेब लोंढे, मुक्तीराम वाव्हळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ. शरद ठाकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis