पंढरपुरात वाल्मिकी मठ उभारण्याचा संकल्प; खालकोनीत वारकऱ्यांचा राज्यव्यापी निर्णय जाहीर
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) भातकुली जवळील खालकोनी गावातून तीर्थक्षेत्र पंढरपुरात वाल्मिकी मठ उभारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प वारकरी संप्रदायातून जाहीर करण्यात आला आहे. हनुमान जयंती महोत्सवात कीर्तनाच्या व्यासपीठावरून हा निर्णय हजारो भाविकांच्या उपस्
पंढरपुरात उभारणार वाल्मीकी मठ  भातकुली तालुक्यात घोषणा


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) भातकुली जवळील खालकोनी गावातून तीर्थक्षेत्र पंढरपुरात वाल्मिकी मठ उभारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प वारकरी संप्रदायातून जाहीर करण्यात आला आहे. हनुमान जयंती महोत्सवात कीर्तनाच्या व्यासपीठावरून हा निर्णय हजारो भाविकांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आला.

वारकरी भूषण रवींद्र महाराज पाटील खालकोनीकर यांनी आपल्या कीर्तनातून “पंढरीची वारी हीच खरी जीवनशुद्धी” असा संदेश देत पायी वारीचे महत्त्व अधोरेखित केले. “वर्षातून एकदा वारी नाही, तर जीवनच अपूर्ण आहे,” असा ठाम संदेश देत त्यांनी भाविकांना पंढरी वारीकडे आकर्षित केले.

या वेळी जाहीर करण्यात आले की महर्षी वाल्मीकी पायी दिंडी सोहळा 19 जून 2026 रोजी खालकोनी (सामदा-काशीपूर) येथून सुरू होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करेल. 18 जुलै रोजी दिंडीचे पंढरपुरात आगमन होणार असून 19 जुलैपासून भागवत कथेचा प्रारंभ होईल. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त

दरम्यान, पंढरपुरात वाल्मिकी मठ उभारण्यासाठी चंद्रभागा नदीकाठी 15 गुंठे जागा खरेदीचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

“मागे हटायचे नाही, मठ उभारायचाच” असा निर्धार व्यक्त करत या उपक्रमाला राज्यव्यापी स्वरूप देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खालकोनी येथील हा संकल्प आता राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरत असून या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande