
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येत्या सोमवारी, दि. 20 एप्रिल रोजी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सर्वांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी