महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न प्रकरणी विहिंप पदाधिकाऱ्याची हकालपट्टी
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.) एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती जिल्हा महामंत्री रुपेश राऊत याची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी विहिंपने घेतलेल्या बचावात्मक
महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न प्रकरणी विहिंप पदाधिकाऱ्याची हकालपट्टी


अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)

एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती जिल्हा महामंत्री रुपेश राऊत याची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी विहिंपने घेतलेल्या बचावात्मक भूमिकेमुळे चर्चेला उधाण आले आहे.

राऊत ११ एप्रिल २०२६ पर्यंत विहिंपचा जिल्हा महामंत्री म्हणून सक्रिय होता. मात्र, महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच संघटनेची नाचक्की टाळण्यासाठी 'आम्ही त्याला एक वर्षापूर्वीच काढून टाकले आहे', असा पवित्रा विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. यावरून संघटनेने या प्रकरणातून पूर्णपणे हात वर केल्याचे दिसून येत आहे.राऊत याचा वावर केवळ परिषदेपुरता मर्यादित नव्हता. २०२३ पर्यंत तो अमरावती भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा संयोजक म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे, मार्च २०२६ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गुरुकुंजआश्रमात आयोजित कार्यक्रमातही तो संघाच्या बड्या पदाधिकाऱ्यांसोबत सक्रिय दिसून आला होता.गुरुकुंज मोझरी येथील अनेक महिलांना राऊत याने अश्लील संदेश पाठवल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारानंतर संतप्त महिला आता पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. या दबावामुळेच गुरुकुंज आश्रम येथील गजानन महाराज मंदिराच्या सचिवपदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.एकीकडे मंदिर समिती आणि विहिपने कारवाईचा बडगा उगारला असताना, श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यात्म विभागाने मात्र अद्याप राऊत याला पदावरून हटवलेले नाही. गंभीर आरोप होऊनही विभागाकडून कारवाई टाळली जात असल्याने त्याचा पाठीराखा नेमका कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.वारंवार फोन करून शारीरिक सुखाची आरोपी राऊत याने एका महिलेला मागणी केल्यानंतर पीडित महिला जेव्हा आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली, तेव्हा तिच्यावर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande