सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
पुणे, 19 एप्रिल (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समताधिष्ठित समाजरचनेचे महान उद्गाते, क्रांतिकारी विचारवंत आणि सामाजिक सुधारणांचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहात
Kkss


पुणे, 19 एप्रिल (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समताधिष्ठित समाजरचनेचे महान उद्गाते, क्रांतिकारी विचारवंत आणि सामाजिक सुधारणांचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी बाराव्या शतकातच समाजात एकेश्वरवाद, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारे भारतीय समाजसुधारक, तत्त्वज्ञ महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संचालक व विभागप्रमुख प्रा.डॉ. विलास आढाव तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande