
सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भव्य मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अस्सल सोलापुरी भीम जयंती मिरवणुकीसाठी परराज्यांसह विविध तालुक्यांतील भीम अनुयायी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत.
शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट, डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या दिंड्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष—असा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. “जय भीम” च्या घोषणांनी सोलापूर अक्षरशः दणाणून गेले असून, सामाजिक एकात्मतेचे जिवंत चित्र या मिरवणुकीतून दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड