आरटीई प्रवेश प्रक्रिया सोडतीत अडीच हजारांवर विद्यार्थ्यांची लॉटरी
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.) सध्या दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे लक्ष नाही, मात्र मोबाईलवर मॅसेजची टोन आली की आपोआप पालकांचे कान व डोळे त्याकडे टवकारल्या जात आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत काढण्यात आली असून निवड झालेल्या पाल्यांच
अडीच हजारांवर विद्यार्थ्यांची लॉटरी


अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)

सध्या दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे लक्ष नाही, मात्र मोबाईलवर मॅसेजची टोन आली की आपोआप पालकांचे कान व डोळे त्याकडे टवकारल्या जात आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत काढण्यात आली असून निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मॅसेज टाकण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाचीच नजर मोबाईलवरील मॅसेजकडे लागले आहे. जिल्ह्यातील २५७ शाळांची यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. त्या अंतर्गत जवळपास अडीच हजार जागांसाठी आठ हजारांवर पालकांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. पाच दिवसांपूर्वी आरटीई सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अडीच हजार जागांचे लकी विजेत्यांची नावेसुद्धा जाहीर झाली असून संबंधित पालकांना मोबाईल मॅसेजद्वारे त्यांना प्रवेशाबाबत माहिती देण्यात येत आहे. २० एप्रिलपर्यंत निवड झालेल्या पालकांना प्रवेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे ज्या पालकांच्या पाल्यांचा नंबर चांगल्या शाळेत लागलेला नाही, त्यांच्याकडून मात्र आरटीईला पाठ दाखविण्यात येत आहे. निवडयादीसोबतच तेवढ्याच संख्येची प्रतीक्षा यादीसुद्धा तयार करण्यात आली आहे. निवडयादीतील पाल्य त्या शाळेत प्रवेश घेणार नसेल तर प्रतीक्षायादीतील पाल्याचा त्याठिकाणी नंबर लागणार आहे.

आरटीई सोडत झाल्यानंतर १० एप्रिल रोजी सोडतीमधील भाग्यवान मुलांची यादी आमच्याकडे आलेली असून संबंधित पालकांना मॅसेज देण्यात येत आहेत. २० एप्रिलपर्यंत पालकांनी त्यांना मिळालेल्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. -संगीता सोनोने, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, जि. प.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande