
त्रंबकेश्वर, 19 एप्रिल (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना वेग आला असून, आता त्र्यंबकेश्वर येथील विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी पुरोहित संघ तसेच प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे येळ मागितली आहे. मुख्यमंत्री २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर दौप्यावर येणार आहेत, त्या दिवशी सहमती मिळाल्यास भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. अन्यथा ४ मे रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करून कामांचा शुभारंभकेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत गोदावरी ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. नाशिकमध्ये रागकाल पथाच्या कामानंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनपथ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आंबेडकर चौक ते त्र्यंबकेश्वर मंदिर या मार्गावर हा दर्शनपथ उभारला जाणार आहे.
या मार्गावर एकावेळी पाच हजार भाविकांना दर्शनरांगेत उभे राहता येईल, अशी व्यवस्था असेल. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हे काम होणार आहे. तसेच मंदिर परिसरातील लहान व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भाविकांना अधिक सुलभ आणि सुरळीत दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
51 फूट ध्वजस्तंभ
सिंहस्थ कुंभमेळ्यात ध्वजाला विशेष महत्त्व असते, हा ध्वज प्रामुख्याने कुंभमेळा स्नानाच्या मुख्य जागेवर उभारला जातो. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ तसेच नवीन गोदाघाट तसेव नाशिक येथे रामतीर्थ परिसरात ध्वजस्तंभ उभारण्यात येतो, त्र्यंबक येथील ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यासाठी पुरोहित संचाने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. हे धर्मध्वज प्रामुख्याने ५१ फूट व ३१ फूट उंचीचे असणार आहेत. या ध्वजावर समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नाच्या प्रतिकृती असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV