ठाणेकर डॉ. नीलिमा दिवेचा यांचा ब्रिटिश संसदेत सन्मान
ठाणे, 19 एप्रिल (हिं.स.)। अस्सल ठाणेकर असलेल्या प्रतिभावान होमिओपॅथ चिकित्सक डॉ. नीलिमा दिवेचा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत ठाणे आणि मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी जगप्रसिद्ध University of Oxford येथे “Scope of Homoe
Thane


ठाणे, 19 एप्रिल (हिं.स.)।

अस्सल ठाणेकर असलेल्या प्रतिभावान होमिओपॅथ चिकित्सक डॉ. नीलिमा दिवेचा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत ठाणे आणि मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी जगप्रसिद्ध University of Oxford येथे “Scope of Homoeopathy in Non Healing Ulcers and Osteomyelitis” या विषयावर आपला संशोधन निबंध सादर केला.

डॉ. दिवेचा यांना हे व्यासपीठ त्यांच्या दीर्घकालीन मेहनत, समर्पण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मिळाले. त्यांच्या संशोधन सादरीकरणाचे British Parliament मधील मान्यवरांनी विशेष कौतुक केले. यामध्ये शिवानी राजा, क्रिश रावल तसेच यूके पंतप्रधानांचे विशेष सल्लागार Myles Stacey यांचा समावेश होता.

या मान्यवरांनी डॉ. दिवेचा यांच्या संशोधनातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करत, होमिओपॅथी उपचारपद्धतीच्या उपयुक्ततेला चालना देणारे हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.

नॉन-हीलिंग अल्सर आणि ऑस्टिओमायलायटिससारख्या गुंतागुंतीच्या व दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथीच्या संभाव्य उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. दिवेचा यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

डॉ. नीलिमा दिवेचा यांच्या या यशामुळे ठाणे, मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande