भोंदूगिरीच्या विरोधातील आवाज दडपले गेले : प्रा. डॉ. गणेश बेळंबे
सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.) १२व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाजातील कर्मकांडातील भोंदूगिरी उघड करत ईश्वरभक्तीला नवे परिमाण दिले. त्यांनी ईस्टलिंगाच्या माध्यमातून देव प्रत्येकाच्या हातात दिला. मात्र, ज्या ज्या संतांनी भोंदूगिरीला विरोध केला, त्या
SDFG


सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.) १२व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाजातील कर्मकांडातील भोंदूगिरी उघड करत ईश्वरभक्तीला नवे परिमाण दिले. त्यांनी ईस्टलिंगाच्या माध्यमातून देव प्रत्येकाच्या हातात दिला. मात्र, ज्या ज्या संतांनी भोंदूगिरीला विरोध केला, त्यांना त्या काळातील प्रस्थापित समाजव्यवस्थेकडून संपविण्यात आले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गणेश बेळंबे यांनी केले.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे आयोजित बसव व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर, भाजपा जिल्हा सदस्य जगन्नाथ गायकवाड, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार आदी उपस्थित होते.प्रा. बेळंबे पुढे म्हणाले की, भोंदूबाबा सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. लोकांच्या बुद्धीला भ्रमित करून ते आर्थिक व मानसिक शोषण करतात. काही वेळा आपल्या शिष्यांवरही अत्याचार होतात. सध्याच्या काळात विकारांचा पूर वाढत असून, त्यामुळे सदाचाराचा प्रभाव कमी होत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande